महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – चेन्नई – दि. १ एप्रिल – –क्रिकेट जगतात कोरोनामुळे लागलेल्या बायो बबलच्या नियमामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सततच्या बायो-बबलमुळे कुटुंबापासून दूर रहावे लागलेल्या खेळाडूंनी आता क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. जोश फिलिप, मिचेल मार्श यांच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूने IPL 2021मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचा धक्का महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला बसला आहे.
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड याने आगामी आयपीएल २०२१मधून माघार घेतली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने आपले मत मांडले आहे. गेल्या १० महिन्यांपासून वेगवेगळ्या कालावधीत बबल आणि क्वॉरंटाईन व्हाव लागत आहे. त्यासाठी मी क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला आता काही महिने परिवारासोबत राहायचे आहे. त्यांच्यासोबत मला वेळ घालवायचा आहे. त्यासाठी संघातून माघारी घेत दोन महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियात राहणार आहे. असे स्पष्टीकर जोश हेझलवूडने दिले आहे.
मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरस्त राहण्यासाठी मला स्वतःला वेळ हवा आहे. यासाठी मी असा निर्णय घेतला असून मी त्या निर्णयामुळे खुश असल्याचेही हेजलवुडने म्हटले आहे. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल ऑक्शन २०२० मध्ये हेजलवुडला २ कोटीने खरेदी केले होते.