महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – चेन्नई – दि. १ एप्रिल – –साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. 51 वा दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 50 सेलिब्रिटींना देण्यात आला आहे. आता 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत गेली पाच दशके सिनेमा जगतावर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं.
मुझे इस बात की अत्यंत खुशी है कि 2019 का दादासाहेब फ़ाल्के अवार्ड रजनीकांत को मिला है।
5 सदस्यों की ज्यूरी @ashabhosle @SubhashGhai1 @Mohanlal @Shankar_Live #BiswajeetChatterjee ने एकमत से इसकी सिफारिश की है।— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) April 1, 2021