Gold Rate Today: कोरोना चे संकट ; ऐन लग्नसराईच्या काळात सोने पुन्हा महागले, पहा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ६ एप्रिल ।कोरोना महामारीच्या काळात जागतिक बाजारपेठेत झालेल्या सकारात्मक बदलामुळे आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती (Gold/Silver Price) वाढल्यात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढत्या दराचा स्थानिक बाजारातही परिणाम दिसून आलाय. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर (Gold Rate) प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांनी वाढला. सोन्याप्रमाणे चांदीचा भावही वाढला. एक किलो चांदीची किंमत (Silver Rate) 62 रुपयांनी वाढली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, अमेरिकन डॉलरमधील कमकुवतपणा आणि कोरोना साथीच्या वाढत्या प्रकरणांमुळे सोन्याला आधार मिळालाय. (Gold silver Rate Today: Corona epidemic raises 06 april 2021 gold prices, check 10 gram gold prices silver price)

सोन्याची नवीन किंमत (Gold Price on 6 April 2021)
मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांनी वाढून 45,049 रुपये झाला. गेल्या व्यापार सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 44,966 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीची नवीन किंमत (Silver Price on 6 April 2021)
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 62 रुपयांनी वाढून 64,650 रुपये झाली. मागील व्यापार सत्रात चांदीचा भाव 64,588 रुपये प्रतिकिलो होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या. सोने प्रति औंस 1,733 डॉलर होते. चांदी मात्र प्रति औंस 24.97 डॉलरवर स्थिर राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *