महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ७ एप्रिल – कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकारणांमुळे महाराष्ट्रात सरकार काही नवीन निर्बंध लादले आहे. ज्यात पुढील आदेश होईपर्यंत सिनेमा हॉल आणि थिएटरलाही ‘टाळेबंद’ केले गेले आहे. अशा परिस्थितीत फिल्म निर्मात्यांनी सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित ‘राधे- युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) हा चित्रपट इतक्यात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे (Salman Khan Upcoming Movie Radhe will postpone due to corona).
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील बर्याच राज्यांत रेकॉर्ड ब्रेकिंग प्रकरणे नोंदवली जात आहेत. महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ लागला आहे. केवळ सामान्य जनताच नाही तर, बॉलिवूडमधील स्टार एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या बातम्या समोर येत आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने नुकतीच 50 टक्के क्षमतेची थिएटर उघडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर फिल्ममेकर्सनी त्यांचे रखडलेले चित्रपट लवकरात लवकर रिलीज करण्यासाठी तारखादेखील बुक केल्या. पण आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र सरकारने नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. नव्या निर्बंधांनुसार पुन्हा एकदा सिनेमा हॉल, थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंद करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर पुन्हा लॉकडाऊन लावल्याने फिल्म इंडस्ट्रीची निराश झाली आहे. बऱ्याच लोकांना अशी आशा होती की, सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रसिद्धीचा विक्रम मोडेल. पण सद्य परिस्थिती पाहता आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे कळते आहे (Salman Khan Upcoming Movie Radhe will postpone due to corona).