महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नागपूर । दि. ९ एप्रिल ।महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. नागपुराता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. (Weather Alert Nagpur unseasonal rains with strong winds in Vidarbha)
नागपुरातील हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. मात्र आजपासून हवेच्या दिशेत बदल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच येत्या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Weather Forecast and Warning for Vidarbha Dated 08-04-2021 pic.twitter.com/2fEZI5wKoG
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) April 8, 2021
तर दुसरीकडे पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानदेखील वाढत आहे. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग साचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.