लस वाया घालवण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवू नका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ९ एप्रिल ।महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणावरून राजकारणाचा पारा चांगलाच चढलाय. महाराष्ट्र सरकारने वारंवार कोरोनाची मागणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यापासून अगदी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर  यांनी अनेक दावे करत सरकारवर आरोप केले. याला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. प्रकाश जावडेकर यांनी काही आकडेवारी देत महाराष्ट्रात 6 टक्के कोरोना लसी वाया केल्याचा आरोप केला. हा आरोप राजेश टोपे यांनी खोडून काढलाय. तसेच महाराष्ट्राच्या सुपुत्राने महाराष्ट्राची बदनामी करु नये, असं आवाहन केलंय (Rajesh Tope hit Prakash Javdekar over wrong facts on Corona Vaccination in Maharashtra).

राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.”

जावडेकरांनी काय दावा केला?
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत दावा केला, “महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करु नये. आजपर्यंत राज्याला एकूण 1 कोटी 6 लाख 19 हजार 190 कोरोना लस देण्यात आल्यात. यापैकी 90 लाख 53 हजार 523 कोरोना लसी वापरण्यात आल्यात. त्यात 6 टक्के कोरोना लसी म्हणजेच 5 लिटर कोरोना लस वाया गेल्या. सध्या 7 लाख 43 हजार 280 कोरोना लस प्रक्रियेत आहेत. सध्या महाराष्ट्रात जवळपास 23 लाख कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्राला जितक्या कोरोना लस वापरात आल्यात त्यापेक्षा अधिक लसींचा पुरवठा केलाय.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *