सावधान – केरळात ‘करोना’चा आणखी एक रुग्ण

Spread the love
महाराष्ट्र २४ – तिरुवअनंतपुरम: भारतात करोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये करोना विषाणूची लागण झालेला हा दुसरा रुग्ण आहे. याआधी चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थिनीला करोना विषाणूची लागण झाली होती. त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये तिला दाखल करण्यात आलं असून, प्रकृती स्थिर आहे.

चीनहून काही दिवसांपूर्वी परतलेल्या केरळमधील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचं रविवारी स्पष्ट झालं. करोना विषाणूची लागण झालेला हा भारतातील दुसरा रुग्ण आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *