कालपासून बदलेल्या या नियमांमुळे खिशावर होणार परिणाम

Spread the love

महाराष्ट्र २४- 1 फेब्रुवारीपासून अनेक नियमांमध्ये बदल झाले असून, यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. एलआयसीच्या अनेक योजना बंद होणार असून, एटीएम कार्डाबाबतही बदल होणार आहेत. काही नवीन नियमांमुळे तुम्हाला दिलासा मिळेल, तर काही नियमांमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप –1 फेब्रुवारी 2020 पासून 75 लाख स्मार्टफोनमधील व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद करणार आहे. त्यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या स्मार्टफोन युजर्सला नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. 1 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअ‍ॅप अँड्राईड व्हर्जन 2.3.7 आणि आयओएस 7 स्मार्टफोनवर काम करणे बंद करेल. कंपनीने याबाबत म्हटले आहे की, त्यांच्या या निर्णयाचा परिणाम अधिक युजर्सवर होणार नाही. कारण अधिकतर युजर्स नवीन स्मार्टफोन्सचा वापर करतात.कंपनीने म्हटले आहे की, अँड्राईडच्या किटकॅट म्हणजेच 4.0.3 व्हर्जन व त्यावरील व्हर्जन असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट मिळेल. मात्र त्याखालील व्हर्जनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.

एलआयसी –एलआयसी 31 जानेवारी 2020 पासून आपल्या 23 योजना बंद केल्या आहेत. नवीन गाईडलाईन्सनुसार नसणाऱ्या विमा योजना बंद करण्याचे आदेश इरडाने कंपन्यांना दिले होते.  या आधी या योजना बंद करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 होती. मात्र मुदत वाढवण्यात आली होती. सध्या सुरु असलेल्या विम्यामध्ये काही बदल अथवा परत परवानगी घेण्यासाची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे.

एटीएम –पोस्ट खात्याने आपल्या बचत खातेधारकांना मोबाईल नंबर अपडेट करण्यास आणि 31 जानेवारीपर्यंत मॅग्नेटिक एटीएमकार्डमध्ये नवीन ईएमव्ही चीप आधारित कार्ड बदलण्यास सांगितले आहे. असे न केल्यास कार्ड ब्लॉक होईल.

संप – तीन दिवस देशातील बँका बंद राहणार आहेत. 31 जानेवारीपासून बँक यूनियनने 2 दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. म्हणजेच 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी बँका संपामुळे बंद असतील व 2 फेब्रुवारीला रविवार असल्याने बँका बंद राहतील. यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहेत.

व्याज दर स्थिर –आरबीआयची पुढील आढावा बैठक जानेवारीला होणार आहे. आरबीआय रेपो दरामध्ये कोणतेही बदल न करण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 7.35 टक्के आणि जानेवारीमध्ये हा दर 8 टक्क्याच्या वरती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरबीआय रेपो दरात बदल न करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *