सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण ; कमॉडिटी बाजारात नफावसुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ९ एप्रि तेजीत असलेल्या सोने आणि चांदीमध्ये आज शुक्रवारी नफावसुली दिसून आली आहे. मागील दोन सत्रात सोने ८०० रुपयांनी महागले होते. मात्र आज त्यात ११० रुपयांची घसरण झाली आहे. सोने सध्या ४६७०० रुपयांवर आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४६६७६ रुपये आहे. त्यात १६२ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७०७८ रुपये असून त्यात ४२३ रुपयांची घट झाली आहे. तत्पूर्वी चांदीचा भाव ६७०२१ रुपयांपर्यंत खाली घसरला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४५६० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५५६० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५१६० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९२६० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३८७० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७९०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८१६० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *