चिंताजनक ; पुण्यात अनेक ठिकाणी लसीकरण थांबवले; पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्ण बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ९ एप्रिल -पिंपरी-चिंचवडमधील सर्व लसीकरण केंद्रे होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. लशी उपलब्ध होताच केंद्रे सुरू होतील, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील अनेक रुग्णालयांतही लसीकरण थांबवण्यात आलं आहे.शहरात महापालिकेची ५९ आणि खासगी २८ अशी ८६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. या लसीकरण केंद्रांवर शहरातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाते. परंतु, लसीचा साठा उपलब्ध नसल्याने शुक्रवारी (नऊ एप्रिल) सर्व लसीकरण केंद्र बंद होती.

महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या केंद्रांमार्फत एक लाख ८० हजार ९२ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. तर, खासगी २८ लसीकरण केंद्रामार्फत ५० हजार ७७७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरातील एकूण दोन लाख ३० हजार ८६९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.याशिवाय, पुण्यात मगरपट्टा येथील महापालिकेच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये आज लसीचे ५० डोस आले होते. एक तासात लसीकरण बंद पडले. तसंच, येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात आज सकाळीच लसीचा साठा संपला असून नागरिक लसीची वाट बघत आहेत. मावळमध्येही लसीकरण थांबवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *