पुणे जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांची होतेय सर्रासपणे लूट!

Spread the love

Loading

छावा स्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना निवेदन

छावा स्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना निवेदन

लाईव्ह महाराष्ट्र 24। पुणे । विशेष प्रतिनिधी ।

वर्षभरापासून राज्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्य शासन व प्रशासन यांनी अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात यशही आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटासमयी अनेक खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रुग्णांना रुग्णालयात दाखल करत असतानाच खासगी हॉस्पिटलकडून अव्वाच्या सव्वा डिपॉझिटची मागणी केली जात आहे. अशा खासगी रुग्णालयांना कोव्हीड समर्पित हॉस्पिटल म्हणून शासनाने मान्यता देखील दिलेली आहे. तरीही या रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची सर्रासपणे लूट होत आहे, अशा रुग्णालयांवर ताबडतोब कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन छावा स्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना इमेलद्वारे दिलेले आहे.

रुग्णाला रुग्णालयात दाखल करतेवेळी अनामत रक्कम म्हणून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. अशा वेळी अनेकांनी जागा विकूण, दागिने मोडून, व्याजाने पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये पैसे भरले. यामुळे काहींना उपचार घेणे ही कठीण गेले व जात होते. अशा अनेक तक्रारी येत छावा स्वराज्य सेनेकडे येत असल्याचे पडवळ यांनी निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात आरोग्यमंत्री यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना आदेश दिले की हॉस्पिटलकडून अ‍ॅडमिट करण्यासाठी डिपॉझिट जास्त प्रकारची बिले आकारत असतील तर त्यावर कारवाई करण्यात यावी. सरकारी रुग्णालयांत बेड मिळत नसल्याकारणाने रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे जावे लागत आहे.
मात्र तिथेही रुग्णांकडून अनामत रक्कम म्हणून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत.
त्यातच कोरोना या आजारावर उपयुक्त ठरत असलेले रेमडेसिवीर हे इंजेक्शन शासकीय रुग्णालयांत 800 ते 1200 रुपयांना मिळते मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये याची किंमत 2800 ते 3000 रुपये एवढी आकारली जात आहे. ही एक प्रकारे रुग्णांची सर्रासपणे लूटमारच केली जात आहे. त्याचप्रमाणे प्लाझ्मा डोनर उपलब्ध असतानाही महापालिका प्रत्येक रुग्णांकडून 6 हजार रुपये शुल्क आकारत आहे. यावरही कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. आदी मागण्या पडवळ यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

रुग्णाला रुग्णालयात दाखल करतेवेळी अनामत रक्कम म्हणून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. अशा वेळी अनेकांनी जागा विकूण, दागिने मोडून, व्याजाने पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये पैसे

 भरले. यामुळे काहींना उपचार घेणे ही कठीण गेले व जात होते. अशा अनेक तक्रारी आमच्या छावा स्वराज्य सेनेकडे येत आहेत. सरकारने अशा लूटारु खासगी रग्णालयांवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आम्ही त्यांना लॉक करु.
-राजेंद्र पडवळ,
प्रदेशाध्यक्ष, छावा, स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *