प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । लंडन । दि.१० एप्रिल । राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने ही घोषणा केली.

बकिंगहॅम पॅलेसकडून आलेल्या पत्रकात म्हटलं आहे, “अतीव दुःखाने हर मॅजेस्टी राणी एलिझाबेथ त्यांचे प्रिय पती हिज रॉयल हायनेस द प्रिन्स फिलीप, ड्यूक ऑफ इडिनबरा यांच्या निधनाची बातमी जाहीर करत आहेत.””हिज रॉयल हायनेस आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये शांतपणे निवर्तले.”राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातवंडं आणि दहा पतवंडं आहेत.

त्यांचे पहिले पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स यांचा 1948 मध्ये जन्म झाला होता, त्यांच्यानंतर त्यांच्या भगिनी, द प्रिन्सेस रॉयल, प्रिन्सेस ॲन यांचा 1950 मध्ये, 1960 साली ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांचा आणि 1964 साली अर्ल ऑफ वेलेक्स प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म झाला.प्रिन्स फिलीप यांचा 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक बेटावर जन्म झाला होता. त्यांचे वडील प्रिन्स अँड्र्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे राजे जॉर्ज (पहिले) ऑफ हेलेनेस यांचे कनिष्ठ पुत्र होते.त्यांच्या आई प्रिन्सेस ॲलिस लॉर्ड माउंटबॅटन यांची मुलगी आणि राणी व्हिक्टोरिया यांची नात होत्या.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, प्रिन्स फिलीप हे असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान होतं.
डाउनिंग स्ट्रीट इथून बोलताना बोरिस म्हणाले, राजघराण्याला योग्य वाटचाल करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाट होता. राष्ट्राचा समतोल आणि सुख जपण्यासाठी राजघराणं एक व्यवस्था म्हणून अग्रणी ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *