महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० एप्रिल ।राज्य सरकारने राज्यात वीकेंड लॉकडाऊन केल्यानंतर आज सर्व ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. धावती गर्दीच्या मुंबईत सर्व रस्ते ओस पडले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईत सर्व ठिकाणी कडक निर्बंध आहेत. जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियम नागरिकांकडून पाळले जात आहेत. मुंबईमध्ये अन्न आणि आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी सुरू आहे.शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू झाला आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा कडक वीकेंड लॉकडाऊन राहणार आहे.