चीनमध्ये आता बर्ड फ्लूचा धोका? ४५०० कोंबड्याचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ , हुनानः चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसची भीती जगभर पसरली आहे. चीनमध्ये करोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसची भीती पसरली असताना आता चीनमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. हुनान प्रांतातील शुआंगक्विंग जिल्ह्यात रविवारी एका पोल्ट्री फार्ममध्ये एकाचवेळी हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने चीनमध्ये बर्ड फ्लू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चीनमध्ये करोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार ५६२ जणांना याची लागण झाली आहे. हुबेई प्रांतच्या स्थानिक आरोग्य विभागाने सोमवारी याची माहिती दिली. रविवारी एका दिवसात करोनामुळे ५७ लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. हुनान प्रांतातील शुआंगक्विंग जिल्ह्यात रविवारी एका पोल्ट्री फार्ममध्ये एकाचवेळी हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने चीनमध्ये बर्ड फ्लू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे पोल्ट्री फार्म दक्षिण सीमेवर आहे. सध्या चीनमध्ये करोनाची प्रचंड भीती आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाला असला तरी अद्याप कोणाही व्यक्तीमध्ये एच५एन१ हे व्हायरस आढळले नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे. चीनच्या कृषि मंत्रालयाकडून यासंबंधी माहिती जाहीर करण्यात आली आहे. श्याओयांग शहरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना उघडकीस आली आहे. फार्ममध्ये ७५०० कोंबड्या होत्या. यातील ४५०० कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत १७ हजार ८२८ कोंबड्यांना मारले आहे. करोना व्हायरसचा सामना करीत असताना बर्ड फ्लू आल्याने चीन सरकारपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. चीनमधील १२ शहरे ठप्प झाली आहेत या शहरातील ५.६ कोटी लोक स्वतःच्या घरात कैद आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *