लवंगीचा करा आहारात समावेश ; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.११ एप्रिल ।भारतीय खाद्यपदार्थात मसाला म्हणूनही लवंगचा वापर केला जातो. लवंग खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणूनच, बर्‍याच प्रकारची औषधे तयार करण्यातही याचा उपयोग होतो. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की, लवंगामुळे यकृत आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, लवंग खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. ज्या प्रकारे सध्या कोरोना वाढत आहे या काळात तर आपल्या आहारात जास्तीत-जास्त लवंग घेतली पाहिजे. (Clove beneficial for boosting the immune system)

लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, जे तीव्र आजारांना नियंत्रण देणारे असतात. लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक कंपाऊंड असते जे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. अँटिऑक्सिडेंटयुक्त लवंगा खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं.लवंगामध्ये आढळणारी संयुगे रक्तातील साखर नियंत्रित करतात. यामध्ये सापडलेला नायजीरिसिन हा एक महत्त्वाचा घटक, मधुमेहावरील रामबाण उपाय असून, पेशी सुधारण्यास मदत करतो. यामुळे, मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, लवंगामुळे पोटातला अल्सर कमी होतो. पोटाच्या अल्सरला पेप्टिक अल्सर देखील म्हणतात. सामान्यत: ते संसर्गामुळे उद्भवतात. या लवंगाचा अर्क पोटातील अल्सरच्या उपचारात बर्‍याच अँटी-अल्सरेटिव्ह औषधांसारखे औषधांसारखे गुणकारी असल्याचे दिसून आले आहे.लवंगेचा फाजील वापर केल्यास डोळे, मूत्राशय व हृदयावर परिणाम वाईट होतो. तोंड येते, जिभेला जखम होते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्राणवह स्त्रोतसाच्या सर्व विकारात लवंग उत्तम काम करते. सर्दीने सतत नाक वाहत असेल तर एकएक करून तीन-चार लवंग लागोपाठ चघळाव्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *