महेंद्रसिंह धोनीनं फलंदाजीसाठी वर यायला हवं ; इतरांसमोर फलंदाजीचा आदर्श ठेवायला हवा – सुनील गावसकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ११ एप्रिल । चेन्नईचा दिल्लीविरोधात पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीनं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं, असा सल्ला सुनील गावसकरांनी दिला आहे. या सामन्याचं समालोचन करताना गावसकरांनी चेन्नईच्या संघातील नवोदितांसमोर फलंदाजीचा आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दिल्ली संघासाठी चेन्नईनं १८९ धावांचं आव्हान ठेवलं होतं जे दिल्लीनं सात गडी राखत पार केलं. धोनी फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर आला व शून्यावर बाद झाला. या संदर्भात बोलताना, “धोनीला सर्व स्तरांवरील सामन्यांचा प्रचंड अनुभव असून त्यानं इतक्या खाली खेळता कामा नये. त्यानं फलंदाजीला वर खेळायला हवं आणि इतरांसमोर फलंदाजीचा आदर्श ठेवायला हवा,” असं गावसकर म्हणाले.

मुंबईमधील वानखेडे स्टेडियमची विकेट फलंदाजीला पोषक होती. प्रथम फलंदाजी करताना आम्हाला जवळपास २० धावा तमी पडल्या असं धोनीनंही सामना संपल्यावर सांगितलं. जर धोनी तिसऱ्या वा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता व चेन्नईनं २०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान दिल्लीसमोर ठेवलं असतं तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा मिळायला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *