महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ११ एप्रिल । भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. यामागे कारण आहे की, ही कार कमी खर्चात चालवली जाऊ शकते. तसेच ईको फ्रेंडलीही आहे. ही कार चालवणे अन्य कारसारखेचं असते. हे आपल्या खिशाला ओझं टाकणारं नसतं. भारतात आतापर्यंत अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहेत. यातील काही कारच्या किंमती खूप अधिक आहेत. आता ऑटोमोबाईल कंपन्या स्वस्त आणि हाय रेंजवाल्या इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहेत. ही कार खरेदी करणं स्वस्त असेल.
Strom R3
Strom R3 एक थ्री-व्हीलर इलेक्ट्रिक कार आहे, जी भारताच लॉन्च होत आहे. विशेष म्हणजे, ही इलेक्ट्रिक कार खरेदी करणं हॅचबॅक कार खरेदी करण्यासारखंच आहे. या कारची किंमत साडेचार लाख रुपये असेल. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. यामध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. १ लाख किलोमीटर आणि ३ वर्ष वॉरंटीसह ही कार मार्केटमध्ये येईल. कंपनीने १०,००० रुपयांच्या टोकन अमाऊंटमध्ये या कारचे बुकिंग सुरू केले आहे. ही भारताची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे. आगामी महिन्यात ही कार लॉन्च केली जाऊ शकते. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये २०० किलोमीटर प्रवास करण्यास सक्षम असेल.