महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि.१२ एप्रिल । छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बलिदानस्थळाचे दर्शन घेतले. पुणे जिल्ह्यात वढू बुद्रुक येथे असलेल्या समाधीस्थळी छत्रपती उदयनराजे भोसले नतमस्तक झाले. (MP Udayanraje Bhosale visits Vadhu on Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary)
भाजपचे राज्यसभा खासदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले सकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी आले.सुरुवातील समाधी स्थळावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर उदयनराजेंनी दर्शन घेऊन अभिवादन केले. छावा, धर्मवीर, संस्कृत पंडित, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही छत्रपती संभाजी महाराज यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला होता.