ही भाजी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, प्रतिकारशक्तीला चालना देण्यास सक्षम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि.१२ एप्रिल । ‘ब्रोकोली’ची सुपर फूडमध्ये गणना केली जाते. हिरव्या फ्लॉवरप्रमाणे दिसणारा ‘ब्रोकोली’ आपण दोन प्रकारे खाऊ शकता. एक म्हणजे ब्रोकोली पूर्णपणे शिजवू शकतो, तर दुसरी पद्धत म्हणजे त्याला हलकी स्टीम देऊन खाऊ शकता. ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यात बरीच जीवनसत्त्वे देखील आढळतात. (Eating broccoli is beneficial for your health)

-ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. विशेष म्हणजे ब्रोकोली खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत देखील होते आणि सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात तर ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

-ही भाजी आपल्या हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यात कार्टेनोइड्स ल्यूटिन असते, जे रक्तवाहिन्या निरोगी राखण्यास उपयुक्त आहे. यामुळे हृदयाच्या इतर समस्येपासून देखील बचाव होतो

-आपण आपले वजन नियंत्रित ठेवू इच्छित असल्यास नाश्त्यामध्ये ‘ब्रोकोली’ सलाड म्हणून खा. यामध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असतात, जे आपले वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

-व्हिटामिन सी समृद्ध ब्रोकोली आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देण्यास सक्षम आहे. ब्रोकोली आपल्याला बर्‍याच प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *