आयपीएल 2021; टेस्टमधील नंबर 1 बॉलरची धुलाई !19 वर्षांच्या तरुण बॅट्समननं सर्वांचं मन जिंकलं.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि.१२ एप्रिल ।आयपीएल 2021 (IPL 2021) मधील तिसऱ्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 10 रननं पराभव केला. केकेआरनं ही मॅच जिंकली असली तरी सनरायझर्स हैदराबादचा 19 वर्षांचा बॅट्समन अब्दुल समद (Abdul Samad) यानं सर्वांचं मन जिंकलं. समद 19 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला. त्यानं आल्यावर लगेच पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) एकाच ओव्हरमध्ये 2 सिक्स लगावले. समदला टीमला मॅच जिंकून देण्यात अपयश आलं. पण त्यानं फक्त 8 बॉलमध्ये 19 रन करत सर्वांना प्रभावित केलं.

कमिन्सला आयपीएल 2020 च्या लिलावात केकेआरनं 15.5 कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. तो टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 बॉलर आहे. त्याला दोन सिक्स लगावत समदनं त्याची क्षमता सर्वांना दाखवून दिली आहे. समदनं मागच्या आयपीएलमध्येही कमिन्सला एक सिक्स लगावला होता. त्याचबरोबर त्यानं जसप्रित बुमराहला दोन, एनरिक नॉर्खियाला दोन तर कागिसो रबाडाच्या बॉलिंगवर एक सिक्स लगावला आहे.

जम्मू काश्मीरच्या या आक्रमक बॅट्समनचं हे दुसरं आयपीएल आहे. त्यानं आजवर 18 वेगवेगळ्या बॉलर्सचा सामना केलाय. पण यामध्ये त्यानं फक्त 4 बॉलर्सना सिक्स लगावले असून ते सर्व जगातील अव्वल दर्जाचे फास्ट बॉलर आहेत. कमिन्स विरुद्ध 8 बॉलमध्ये 3, बुमराह विरुद्ध 6 बॉलमध्ये 2, नॉर्खियाविरुद्ध 8 बॉलमध्ये 1 तर रबाडाविरुद्ध खेळलेल्या एकमेवर बॉलवर त्यानं सिक्स मारला आहे.

अब्दुल समदला मागील आयपीएल लिलावात (IPL Auction 2020) हैदराबादनं 20 लाखांना खरेदी केलं होतं. तो आयपीएलमध्ये खेळणारा जम्मू काश्मीरचा चौथा खेळाडू आहे. मागच्या आयपीएलमध्ये त्यानं 12 मॅचमध्ये 170 च्या स्ट्राईक रेटनं 111 रन काढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *