महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१२ एप्रिल ।राज्यात वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तरीही विनाकारण काही नागरिक बाहेर फिरतांना दिसतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी मनमाड पोलिस, पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने एक अनोखी शक्कल लढवली.
पोलिस, पालिका आणि आरोग्य विभाग यांचे संयुक्त पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर विनाकारण फिरणार्यांना पकडले. त्यांची थेट ऑन द स्पॉट त्यांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अनोख्या कारवाईमुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल, असे मत मनमाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते आणि पालिका मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांनी व्यक्त केले.