असा असेल नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पिंपरी चिंचवड । दि.१३ एप्रिल । गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. आज मंगळवार हा वार हनुमानजींना समर्पित असतो. पहा कोणत्या राशींवर राहणार हनुमानजींची कृपा.

मेष – जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. मुलांसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. बचतीच्या बाबतीत गंभीरपणे विचार करा जोडीदारासोबत असलेले मतभेद संपवण्याचा प्रयत्न होईल. . दिवस चांगला आहे. भविष्यातील योजनांकडे लक्ष द्या.

वृषभ – नोकरीत जबाबदारीचे काम मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामात मन लागेल. नशिबाची साथ मिळेल. आता केलेले प्रयत्न सफल होण्याची शक्यता आहे.काही लोक तुम्हाला नवीन गोष्टी करण्यास प्रेरित करतील.

मिथुन – व्यावसायात नशिबाने अधिकतर कामं पूर्ण होतील. पैसा किंवा कामाबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुलांची मदत मिळेल. सकारात्मक राहाल. विचार केलेली कामं पूर्ण कराल.

कर्क – व्यवसायात आज केलेल्या योजना पुढील काळासाठी फायदेशीर ठरु शकतात. मानसिक आणि शरीरिकरित्या व्यस्त राहाल. मुलांच्या यशाने आनंदी व्हाल. कामापासून मागे हटू नका. पैसे कमावण्याचा नवा मार्ग मिळू शकतो.

सिंह – काही गोष्टींचा खोलवर विचार कराल. मित्रांच्या सल्ल्याने फायदा होण्याची शक्यता आहे.
तुमच्या मदतीने एखाद्याची समस्या सुटू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहिल.

कन्या
आज तुमचं कुठल्या कामासाठी कौतुक होऊ शकते. नोकरी करणार्‍यांसाठी दिवस चांगला असेल. आरोग्य चांगले राहील. आजचा दिवस उत्तम असेल. तणाव दूर होऊ शकतो. व्यवसाय वाढेल. अविवाहितांचा विवाह निश्चित केला जाऊ शकता.

तुला
आज काही कामांत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक बोला. काही नवीन योजनांवर काम सुरू होऊ शकेल. एखादी व्यक्ती आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकते. आपले बजेट नियंत्रित केले जाईल. तरुणांना नोकरी मिळू शकते.

वृश्चिक
आज तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकेल. कोणालाही सल्ला देऊ नका. कार्यालयात वाद टाळा. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची गरज आहे.  जोखीम घेऊ नका. खूप व्यस्त असाल. थकल्यासारखे वाटू शकते.

धनु – नातेसंबंधांबाबत काही गोष्टी खास ठरतील. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. उत्साही राहाल. नवीन लोकांशी जोडले जाल. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा.

मकर – सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. उत्साही राहाल. नवीन विचार मनात येतील. आज व्यावहारिक राहाल. त्यामुळे फायदा होईल.नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला ठरु शकतो.

कुंभ – सकारात्मक व्यक्तीशी बातचीत होऊ शकते. तुमच्या कामाबाबत गंभीरपणे विचार करा.कामासाठी प्रवास होऊ शकतो. विवाहसंबंधी चर्चा होऊ शकते. दुसऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नवीन लोकांच्या ओळखीने फायदा होईल.

मीन – तुमच्या भावना, टेन्शन शेअर कराल. दररोजची कामं पूर्ण होतील. जोडीदाराची साथ मिळेल. अचानक फायदा होईल. चांगल्या लोकांशी ओळख होऊ शकते. या ओळखीमुळे तुमचे विचारही बदलू शकतात. धनलाभाचा योग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *