रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिणे शरीरासाठी लाभदायी! वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१३ एप्रिल । रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिल्याने अनेक गंभीर आजार दूर होतात. मेथीच्या पाण्याचे आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ यात

# मेथीमध्ये हायड्रॉक्सिसिल्युसीन नावाचा अमीनो अॅसिड असते. ज्यामुळे मधुमेह कमी होण्यास मदत होते. यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास होतो. त्यांनी
मेथीचे पाणी प्यावे.

# मेथीचे पाणी पिल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते.

# मेथीचे पाणी बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यावे
लागेल.

# लिंबू आणि मधसोबत मेथी घेतल्यास ताप कमी होतो. खोकला किंवा घशात दुखत असेल तर मेथीचे पाणी पिणे देखील फायदेशीर आहे.


( दिलेली माहिती म्हणजे उपचार नव्हे कोणत्याही आजरांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *