महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१४ एप्रिल । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवरून माहिती दिली आहे.
‘प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. तसंच तज्ञांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची चाचणी करावी आणि काळजी घ्यावी,’ असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत केलं आहे.
https://twitter.com/myogiadityanath/status/1382234422179602432?s=20