अवकाळी पावसाने पश्चिम महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेल्या पिकांची दाणादाण

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । सातारा दि.१५ एप्रिल । राज्यावर कोरोनाचे संकट आलेले असतानाच आता गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱया अवकाळी पावसाने पश्चिम महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेल्या पिकांची दाणादाण उडवली आहे. सातारा जिह्यातील वाठार स्टेशन आणि खटाव तालुक्यात आज मोठय़ा प्रमाणावर गारपीट झाली. सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्ग दोन किलोमीटर अंतरावरील रस्ता बर्फाने माखून गेला होता. सांगली जिह्यातील आटपाडी तालुक्यातही आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहरासह जिह्यातही आज वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाला. सोलापूर शहर व जिल्हय़ात वादळी व अवकाळी पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्याला बसला असून, 3800 शेतकऱयांचे फळबागांचे नुकसान झाले आहे. रब्बी पिकाबरोबरच द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पपई फळबागांचे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात फळबागांचे नुकसान
जिल्हय़ात वादळी व अवकाळी पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पंढरपूर तालुक्याला बसला असून, 3800 शेतकऱयांचे फळबागांचे नुकसान झाले आहे. रब्बी पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पपई फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर जिल्ह्यात तुफान पाऊस
नगर जिल्ह्याच्या अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युत पुरवठासुद्धा खंडित झाला होता. नगर शहरातही सायंकाळी जोरदार वाऱयासह पावसाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *