महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । मराठवाडा विशेष प्रतिनिधी: संजीवकुमार गायकवाड । दि.१६ एप्रिल। हिंगोली – जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील चोरीच्या 29 दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या असून गुरुवारी एका आरोपीला गजाआड केले असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकारांना सांगितले. हा आरोपी परभणी जिल्ह्यातील गडदगव्हाण (ता.जिंतूर) येथील रहिवासी आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर पोटे,एस.एस.घेवारे, बालाजी बोके,शंकर जाधव, विलास सोनवणे,सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर,संभाजी लेकुळे, भगवान आडे,शंकर ठोंबरे,राजू ठाकूर,किशोर कातवडे,विशाल घोळवे,ज्ञानेश्वर सावळे,आदींनी आरोपीस हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर केले.पुढील तपास सपोनि बळीराम बंदखडखे,पोलीस उपनिरीक्षक कांबळे धामणे हे करीत आहेत.
शहर व परिसरातील मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून, (दि.10)एप्रिल रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी विशेष पथक तयार करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले. त्यानुसार नियुक्त पथकाला दुचाकी चोरीची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे उदय खंडेराय, उपनिरीक्षक किशोर पोटे यांनी व ग्रामीण ठाणे यांच्या पथकाने औंढा परिसरात गोपनीय बातमीदाराकडून दुचाकीचोरी करणारे व विकत घेणारे यांची माहिती काढली.त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सचिन उर्फ राजू रामा खिल्लारे वय 26 रा.गडद गव्हाण ता.जिंतूर जि. परभणी याच्यासह इतर दोन साथीदारांनी दुचाकी चोरी करून बनावट आरसी बुक,कागद पत्रे तयार करून चेसिस नंबरची खाडाखोड करून परिसरातील गडदगव्हाण,दाभा,जोड परळी, टेंभुर्णी,डिग्रस येथे गाड्या विक्री केल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या आरोपीला पोलीस खाक्या दाखवताच त्याने हिंगोली दोन, नांदेड दोन, परभणी एक, वाशिम तीन,औरंगाबाद दोन,अकोला एक,बुलढाणा एक व इतर जिल्ह्यातील अशा एकूण 29 दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याचा मामा हरिदास टापरे,अरविंद टापरे (रा.पांगरी) यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नंतर देतो असे नागरिकांना खोटे बोलून गाडी विक्री करीत असे.त्यानंतर पथकाने विक्री केलेल्या नागरिकांकडून 26 तर त्याच्या घरासमोर लावलेल्या तीन अशा एकूण 29 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जप्त केलेल्या दुचाकींची किमंत अंदाजे 15 लाख 65 हजार एवढी आहे. यातील एका आरोपीस ताब्यात घेतले असून यातील दोन आरोपी हरिदास टापरे,अरविंद टापरे फरार आहेत.