महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी।संजीवकुमार गायकवाड । दि.१७ एप्रिल । नांदेड । दि.15 एप्रिलच्या दुपारी एका 11 वर्षीय बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी जनतेचे मदत करावी, असे आवाहन देगलूरचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी केले आहे.देगलूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.15 एप्रिलच्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास देगलूर येथून एका 11 वर्षीय बालकाला आपल्या चारचाकी गाडी क्र.एमएच-47-वाय-7837 मध्ये महेश शेषराव बोईनवाड रा.कोळनूर सध्या देगलूर याने पळवून नेले होते.
पण काहीवेळानंतर बडूर ता.बिलोली येथे चारचाकी गाडी क्र.7837 आणि त्यात जखमी अवस्थेतील 11 वर्षीय बालक पोलिसांना सापडला आहे. पण आरोपी महेश शेषराव बोईनवाड पळून गेला आहे.देगलूरचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, महेश बोईनवाड हा व्यक्ती कोणाला दिसला तरी त्यांनी पोलीस ठाणे देगलूर येथे संपर्क साधून त्याबद्दल माहिती द्यावी तसेच पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांचा मोबाईल क्र.9552520363 यावर सुध्दा माहिती देता येईल.
एका अल्पवयीन बालकाला पळवून नेवून त्याला जखमी अवस्थेत सोडून पळून जाणाऱ्या आरोपी महेश बोईनवाडला पकडण्यामध्ये जनतेने सहकार्य करावे,अशी अपेक्षा भगवान धबडगे यांनी व्यक्त केली आहे.