महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । लक्ष्मण रोकडे । दि.२९ एप्रिल। मुंबई । राज्यात काल दिवसभरात 63,309 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली असतानाच, या दरम्यान 61181 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन घरी परतले आहेत. त्याचबरोबर आजपर्यंत राज्यात एकूण 37,30,729 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 टक्के एवढे झाले आहे. पण यासोबतच दुःखद बातमी देखील अशी आहे की, राज्यात आज सर्वाधिक 985 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 1.5 % एवढा आहे.
काल पर्यंत करण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44.73,394 (16.86टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तर राज्यात सध्या 42,03,547 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.