National Lockdown : “देशभरात लॉकडाउन लावायला हवा”, केंद्रीय कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांची भूमिका !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२ मे ।“३ ते ५ मे दरम्यान देशात करोना रुग्णांची सर्वाधिक वाढ दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारला करोनाबाबत सल्ला देणाऱ्या पथकाच्या प्रमुखांनी दिली होती. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाउन लावण्याची भूमिका मांडली असल्याची माहिती मिळत आहे. संडे एक्स्प्रेसच्या हवाल्यान इंडियन एक्स्प्रेससं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत ४ लाख १ हजार नवे करोनाबाधित सापडले आहेत. जगभरात एका दिवसात सापडलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. यासोबतच दिवसभरात ३ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाच्या परिस्थितीनं केंद्र सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, टास्क फोर्सच्या एका सदस्याने गेल्या काही आठवड्यापासून टास्क फोर्सचे सदस्य पंतप्रधानांना देशभर लॉकडाउन लावण्याचा पर्याय सांगत असल्याची माहिती दिली. “केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सचा गेल्या काही महिन्यांपासून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण देशभरात लॉकडाउन लावायला हवा. त्या त्या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्वरुपात निर्बंध लावण्याऐवजी राष्ट्रीय लॉकडाउनची गरज आहे. कारण करोना सगळीकडे पसरायला लागला आहे”, असं ते म्हणाले.

आपण मुळातच करोनाकडे चुकीच्या बाजूने पाहात आहोत, असं टास्क फोर्सच्या या सदस्याने सांगिलं आहे. “आपण भुयाराच्या चुकीच्या टोकाकडे पाहात आहोत आरोग्य व्यवस्था अमर्याद वाढवता येणार नाहीत. ऑक्सिजन पुरवठा वाढवूनही तो अपुरा पडतो आहे. आपल्याला रुग्णसंख्या कमी करावीच लागेल. किमान दोन आठवड्यांसाठी जर आपण हे सगळं थांबवू शकलो, तर आपण रुग्णवाढ रोखू शकू. यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी देखील मदत मिळू शकेल”, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *