आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु चे कोलकातापुढे आव्हान

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३ मे ।विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुने ७ सामन्यांपैकी ५ जिंकत १० गुण कमावले आहेत. परंतु मागील तीन सामन्यांत दोन पराभव पत्करल्याने त्यांना गुणतालिकेतील अग्रस्थान गमवावे लागले आहे. मोहम्मद सिराजने अखेरच्या षटकांत तारले नसते, तर हा तिसरा पराभवसुद्धा त्यांच्या वाटय़ाला आला असता. ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली दिमाखदार प्रारंभ करणाऱ्या कोलकाताला नंतर अपयशच अधिक पदरी पडले. सात सामन्यांपैकी पाच पराभव त्यांनी पत्करले आहेत.

कोहली (एकूण १९८ धावा), एबी डीव्हिलियर्स (एकूण २०७ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (एकूण २२३ धावा) या आक्रमक फलंदाजांवर बेंगळूरुच्या फलंदाजीची मदार आहे. याशिवाय गुणी सलामीवीर देवदत्त पडिक्कलसुद्धा (एकूण १९५ धावा) त्यांच्या दिमतीला आहे. बेंगळूरुच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलवर (एकूण १७ बळी) आहे. याशिवाय कायले जॅमिसन (एकूण ९ बळी) आणि मोहम्मद सिराज (एकूण ६ बळी) असे हुकमी गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत.

शुभमन गिल, नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी ही कोलकाताची आघाडीची फळी यंदा अपयशी ठरली. हेच त्यांच्या अपयशाचे प्रमुख कारण आहे. गतवर्षी दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली सात सामन्यांपैकी चार विजय आणि तीन पराभव पत्करल्यानंतर कोलकाताने नेतृत्वबदल करीत मॉर्गनकडे कर्णधारपद दिले होते. त्यामुळे कर्णधार मॉर्गनला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कोलकाताने अद्याप दोन ट्वेन्टी-२० शतके खात्यावर असलेल्या करुण नायरला आणि वेंकटेश अय्यरला संधी दिलेली नाही.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *