जोस बटलर वादळात हैदराबाद नेस्तनाबूत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३ मे । जोस बटलरने (64 चेंडूत 11 चौकार, 8 षटकारांसह 124) पहिलेवहिले तडाखेबंद आयपीएल शतक झळकावल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 55 धावांनी धुव्वा उडवत आणखी एक धमाकेदार विजय साकारला. प्रारंभी बटलर व कर्णधार संजू सॅमसन (33 चेंडूत 48) यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 3 बाद 220 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात कर्णधार बदलूनही हैदराबादच्या पदरी निराशाच आली. त्यांना निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावांवरच समाधान मानावे लागले.

या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत दिवसभरातील पहिल्या लढतीनंतर पाचव्या स्थानी पोहोचला होता. राजस्थानतर्फे ख्रिस मॉरिस (3-29), मुस्तफिजूर रहमान (3-20) यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. कार्तिक त्यागी (1-32), राहुल तेवातिया (1-45) यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.

विजयासाठी 221 धावांचे आव्हान असताना हैदराबादने पॉवर प्लेच्या पहिल्या 6 षटकात बिनबाद 57 धावांसह उत्तम सुरुवात केली होती. या मोसमातील केवळ दुसरा विजय संपादन करण्यात ते यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता होती. मात्र, मुस्तफिजूरने मनीष पांडेचा (31) अडथळा दूर सारला आणि त्यानंतर धोकादायक जॉनी बेयरस्टो (30) व विजय शंकर (8) देखील बाद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *