IPL 2021 वर कोरोनाचे सावट : आणखी एक सामना होणार रद्द?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि.४ मे । यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेवर (IPL 2021) कोरोनाचं सावट वाढू लागलं आहे. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्या टीममधले सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सोमवारी सीएसकेचे 2 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांची राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामना खेळण्याची तयारी नसल्याचं चेन्नई सुपरकिंग्जने बीसीसीआयला (BCCI) कळवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स असा सामना होणार आहे, त्यावर आता कोरोनाचं सावट दिसतं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत माहिती दिली आहे.

चेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipati Balaji) आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मीडिया अहवलानुसार, या दोघांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आल्यास मैदानात उतरू अशी भूमिका चेन्नईने घेत बीसीसीआयला त्यासंदर्भात कळवले आहे. आयपीएलच्या एसओपीनुसार सहा दिवसात तीन चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे त्यानंतरच चैन्नई मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *