IPL वर कोरोनाचे सावट: BCCI लवकरच करू शकते ही मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.४ मे । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (2021) चे उर्वरित सामने मुंबईत होऊ शकतात. BCCI च्या सूत्रांनी सांगितलेकी, यासाठी मुंबईथ सर्व सुविधा केल्या जात आहेत. सोमवारी KKR संघातील दोन खेळाडून वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. यामुळे काल RCB आणि KKR दरम्यान होणारा सामना रद्द करण्यात आला.

BCCI अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या आठवड्यातच IPL चे उर्वरित सामने मुंबईत शिफ्ट केले जाऊ शकतात. सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा निर्णय झाल्यावर बंगळुरू आणि कोलकतासह अहमदाबादमध्ये होणाऱ्या प्लेऑफसह फायनल सामनाही मुंबईत होईल. याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

BCCI च्या या प्लॅननुसार, 8 किंवा 9 मे पासून IPL चे सर्व सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये होऊ शकतात. मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियम आहेत. आतापर्यंत या सीजनमधील 10 सामने वानखेडेमध्ये झाले आहेत. इतर दोन स्टेडियमही सामन्यांसाठी तयार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *