अजित पवारांच्या बैठकीकडे लक्ष ; पुण्यात लॉकडाउन लावण्यासंबंधी आज निर्णय ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । पुणे । रुग्णसंख्या वाढत असलेल्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने सांगितलं. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज आढावा बैठक घेणार असून पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी लॉकडउनवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अजित पवार पुण्यात असून विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात लॉकडाउन लावायचा की नाही यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर लॉकडाउनसंबंधी काय निर्णय झाला आहे याची माहिती मिळेले.

पुण्यात अॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितलं. कोर्टाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचं म्हटलं. तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *