महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । लोणावळा । पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या पुण्यातील लोणावळ्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने हा 12 मेच्या रात्रीपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहे. तर जीवनावश्यक वस्तू केवळ घरपोच करण्याची मुभा देण्यात आलीये.