महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । मुंबई । देशात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव 27 पैशांनी वाढून तो 97.61 रुपयांवर पोहोचला आहे तर डिझेलचा भाव 33 पैशांनी वाढून तो 88.82 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच राजधानी दिल्लीमध्येही पेट्रोलचा भाव 28 पैशांनी वाढून तो 91.27 रुपयांवर पोहोचला आहे तर डिझेलचा भाव 31 पैशांनी वाढून 81.73 रुपयांवर पोहोचला आहे.
या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे पाच राज्यातील निवडणुका हे कारण असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली. निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.
देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर
मुंबई
पेट्रोल- 97.61 रुपये/लिटर
डिझेल- 88.82 रुपये/लिटर
दिल्ली
पेट्रोल- 91.27 रुपये/लिटर
डिझेल- 81.73 रुपये/लिटर
कोलकाता
पेट्रोल- 91.41 रुपये/लिटर
डिझेल- 84.57 रुपये/लिटर
चेन्नई
पेट्रोल- 93.15 रुपये/लिटर
डिझेल- 86.56 रुपये/लिटर