महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । पुणे । संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात Mandir पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती Mahaarti करण्यात आली. वरूथिनी एकादशीचे औचित्य साधून आळंदीतील Alandi संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज Dnyaneshwar Maharaj समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. Samadhi of Saint Dnyaneshwar Mauli is decorated with flowers
वरूथिनी एकादशीला पहाटे पवमान महापूजा Mahapuja करुन समाधीवर दुग्धअभिषेक घालण्यात आला. आजच्या पवित्र दिवसाला वारकरी संप्रदयात महत्वाचे स्थान आहे. मात्र, कोरोनाच्या Corona पार्श्वभुमीवर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.संजीवन समाधी मंदिरात परंपरेनुसार प्रत्येक कार्यक्रम उत्साहात करण्यात येत आहे. त्यामुळे वरूथिनी एकादशीला विविध रंगी फुलांच्या flowers माध्यमातून मंदिर परिसर, गाभारा आणि समाधी स्थळ आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागील वर्षभरापासुन संत ज्ञानेश्वर माउलींचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र या ठिकाणी परंपरेनुसार मंदिर परिसर, गाभाऱ्यात विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात येत आहे.