कडक निर्बंध करण्याच्या सूचना ; पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.७ मे । पुणे । उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शहरातील करोना रुग्णसंख्येचा आढावा घेणारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ‘पुण्यात आता आहे तशा पद्धतीनेच नियम सुरू ठेवावेत, हवं तर आणखी कडक निर्बंध करावेत. जे लोक अनावश्यकपणे बाहेर फिरत आहेत, त्यांना रोखावं, अशी चर्चा या बैठकीत झाली,’ अशी माहिती बैठकीनंतर अजित पवार यांनी दिली आहे.

पुण्यातील स्थिती पाहता कडक लॉकडाऊनचा सरकारने विचार करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या होत्या. त्यामुळे पुण्यात खरंच संपूर्ण लॉकडाऊन होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र सध्या तरी शासनाने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेणं टाळलं आहे.

‘ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे शहरात रुग्णसंख्या वाढलेली नाही, काही प्रमाणात ही संख्या कमी झाली आहे. बैठकीत आमदार-खासदारांनी काही सूचना केल्या. दुसऱ्या टप्प्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसाठी जी धावपळ करावी लागली ती तिसऱ्या लाटेत करायला लागू नये, यासाठी बैठकीत चर्चा झाली,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया, जाणून घ्या ठळक मुद्दे :

– ससूनसह काही ठिकाणी ऑक्सिजन प्लँट सुरू झाले आहेत
– लसींचा पुरवठा कमी असल्याने अडचण होत आहे.
– लसींच्या पुरवठ्याबाबत मी अदर पूनावाला यांना फोन लावला होता, पण ते अजून परदेशात असल्याचं सांगण्यात आलं. तिकडचाही संपर्क     क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *