महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० मे । रविवारच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही. मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,920 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,920 रुपये इतका आहे.
काही दिवसापासून सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होतं असल्याचं पहायला मिळतंय. आज, सोमवारी सकाळी चांदीचा दर 71,500 रुपये इतका आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तर 31 मार्चला तो 65,500 रुपये इतका होता. 30 एप्रिल या दिवशी चांदीचा भाव हा 67,500 रुपये होता. गेल्या दहा दिवसांत चांदीच्या भावात चार हजार रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या दहा दिवसांचा विचार करता सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार दिसून येत आहेत. गेल्या काही महिन्यांचा विचार करता, 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता तर 31 मार्चला तो 44,370 रुपये इतका होता. 30 एप्रिल या दिवशी सोन्याचा भाव हा 45,170 रुपये इतका होता. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.