आरोग्यवर्धक ‘शेवगा’ शेवग्याच्या शेंगेपासून होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० मे ।मुंबई । शेवग्याची शेंग अशी भाजी आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. आयुर्वेदात देखील शेवग्याला खूप जास्त महत्त्व आहे. बऱ्याच आैषधामध्ये शेवग्याचा वापर केला जातो. (Eating drumstick is extremely beneficial for your health)

# शेवग्याच्या शेंगेमधील पोषण घटक- शेवग्यामध्ये बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्याला हंगामी संक्रमणापासून वाचवतात.        शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटामिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखे पोषक घटक असतात. चला तर, या शेवग्याच्या

# पोटाशी संबंधित समस्यांसाठी- पोटाशी संबंधित समस्यांसाठी आपण शेवग्याच्या शेंगा खाऊ शकतो. हे सेवन केल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात. हे पोटाच्या समस्येवर अत्यंत फायदेशीर आहे.

# लठ्ठपणा- वाढते वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या भाजीचे सेवन करणे अतिशय लाभदायी ठरते. यात लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत जे वाढते वजन कमी करण्यात मदत करू शकतात.

# रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण – रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपण शेवग्याचा शेंगा खाऊ शकतो. शेवग्याचा शेंगा घेतल्यास मधुमेह आणि हृदयरोग इत्यादींचा त्रास दूर होतो. म्हणून, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आपण शेवग्याचा शेंगा देखील घेऊ शकता.

# केसांसाठी- शेवग्याच्या फुलांचे सेवन केल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. नियमित सेवन केल्यास केस वाढतात. तुम्ही शेवग्याच्या फुलांचा चहा घेऊ शकता. यामुळे केस चमकदार बनतात.

# हाडे- हेपेटोप्रोटोक्टिव्ह हा असा घटक आहे ज्यामुळे शरीरात अँटी ऑक्सिडंट तयार होतात. तसेच, शेवग्याच्या भाजीत ऑस्टिओपोरोटिक गुणधर्म आहेत जे ऑस्टिओपोरोसिसच्या धोक्यापासून आपल्या शरीराचा बचाव करण्यास मदत करतात

# अँटीसेप्टिक- शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते.

# स्टोनची समस्या – बरेच लोक मूत्रपिंडाच्या समस्येमुळे अस्वस्थ असतात. अशा परिस्थितीत शेवग्याच्या शेंगाचा सूप किंवा भाजी खाणे फायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *