आयपीएलचे उर्वरित सामने भारतातच खेळवले जाऊ शकतात ! बीसीसीआयचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० मे ।मुंबई । आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक महत्वाचे अपडेट आयपीएल 14 च्या संदर्भात समोर आले आहे. आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचे आयोजन देशातच करण्याचा विचार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) करत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी सप्टेंबरमध्ये आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते. इतर देशातील सर्व संघ टी20 विश्वचषकासाठी भारतात येणार आहेत. अशात बीसीसीआय आयपीएलच्या खेळाडूंना वेळेआधी बोलावून बाकी राहिलेल्या सामन्यांचे आयोजन करु शकते.

याबाबत एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर सप्टेंबर महिन्यात देशातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आली तर आयपीएलच्या बाकी सामन्यांचे आयोजन भारतात होऊ शकते. जर विदेशी खेळाडू उपलब्ध होत असतील आणि कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली तर निश्चितपणे टी 20 विश्वचषकाआधी आयपीएलचे सामने खेळवू शकतो, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमध्ये आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन केले जाऊ शकते. इंग्लिश काउंटीच्या वतीने बीसीसीआयला आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *