महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि. ११ मे । राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, कडक निर्बंध यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णामध्ये घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारीपासून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र यावरुन मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. (MNS Sandeep Deshpande On Maharashtra Corona Patient Decrease)
आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत .म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 11, 2021
आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजेच रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश. अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात??? असा सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे.
राज्यात काल दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे त्याचवेळी 61 हजार 607 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट 87 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी 61 हजार 607 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 44 लाख 69 हजार 425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून सध्या हे प्रमाण 86.97 टक्के इतके झाले आहे.