पुणे जिल्ह्यातील २६६ गावांमध्ये दक्षतेचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि. ११ मे । शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात बाधित वाढत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सर्वाधिक रुग्ण असलेल्या २६६ ग्रामपंचायत, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये दक्षतेचा इशारा देऊन संबंधित गावे घोषित केली आहेत.

ग्रामपंचायत, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये टाळेबंदी काळातही रुग्णसंख्या वाढत आहे. अशी संबंधित गावे दक्षतेचा इशारा आणि ज्या भागात रुग्णसंख्या कमी होत नाही, त्या संबंधित गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इशारा घोषित के ला आहे. जिल्ह्यायातील १३ तालुक्यांमध्ये ३८४१ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यायात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू, तर दोन लाख १४ हजार १६१ रुग्ण बाधित आढळले आहेत.

दक्षतेचा इशारा घोषित के लेल्यांमध्ये १४३ गावे, १३ नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींचा समावेश आहे. तसेच १०७ गावांत इशारा देण्यात आला आहे. दक्षतेचा इशारा दिलेल्या गावांमध्ये हवेली, खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि शिरूर तालुक्यातील नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. इशारा दिलेल्या गावांमध्ये आंबेगाव, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि शिरूर या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी रुग्णसंख्या कमी करण्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नगरपालिका – बारामती, भोर, दौंड, इंदापूर, जुन्नर, चाकण, आळंदी, राजगुरूनगर, लोणावळा, तळेगाव दाभाडे, जेजुरी, सासवड आणि शिरूर. नगरपंचायत – माळेगाव, देहू, वडगाव. याशिवाय शिरूर तालुक्यातील २० गावांचा, हवेलीतील १९ गावांचा, खेडमधील १६, मुळशी १४, जुन्नर १३, बारामती ११, आंबेगाव आणि इंदापूर प्रत्येकी दहा, पुरंदर आणि दौंड प्रत्येकी नऊ, भोर सहा, मावळ पाच आणि वेल्ह््यामधील एका गावाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *