म्युकर मायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार : राजेश टोपे

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि. ११ मे । राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त आहेत. त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी केली.

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना सलग सात दिवस दररोज 2 याप्रमाणे 14 इंजेक्शने घ्यावी लागतात. एका इंजेक्शनची किंमत दोन-अडीच हजार रुपये आहे. मात्र, मागणी वाढल्याने या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी हे इंजेक्शन सहा ते सात हजारांना विकले जात असल्याच्या तक्रारी असून, त्याची किंमत निश्‍चित करून त्यावर नियंत्रण आणण्याबाबत पावले उचलली जातील, अशी ग्वाहीदेखील आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *