फक्त 550 रुपयात पुन्हा करा सुरु तुमचे बंद झालेले PPF अकाऊंट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ मे । पुणे । भविष्य निर्वाह निधी (PPF) पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँक किंवा टपाल कार्यालयात लेखी अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर, खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आणखी एक अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला किमान वार्षिक योगदान 500 रुपये आणि 50 रुपये दंड भरावा लागतो.पीपीएफ खात्यात दर वर्षाला किमान 500 रुपये गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात या खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात किमान 500 रुपये भरले नाही, तर त्याचे अकाऊंट निष्क्रीय होते. त्यानंतर या पीपीएफ अकाऊंटवर कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. तसेच हे अकाऊंट मॅच्युरिटी डेटपूर्वी बंदही करता येत नाही.

2016 मध्ये सरकारने पीपीएफच्या नियमात काही बदल केले होते. याअंतर्गत, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत पीपीएफ खाते 15 वर्षांच्या मॅच्युरिटीपूर्वी बंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात आजार किंवा मुलांचे शिक्षण यासारख्या कारणांचा समावेश होतो. पण यासाठीसुद्धा पीपीएफ खात्याने किमान 5 वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. निष्क्रिय अकाऊंटवर ही सुविधा दिली जात नाही.

पीपीएफ अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही यात 5 वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडी, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट आणि टाईम डिपॉजिट स्‍कीमच्या तुलनेत जास्त फायदा मिळतो. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज मिळतो. अशाप्रकारे, पीपीएफ खात्यातील गुंतवणूक ही टॅक्स सेविंग्ससोबतच अधिक परतावा मिळवून देते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडणे फार सोपे आहे. तुमचे पीपीएफ खाते किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीसाठीचे पीपीएफ अकाऊंट हे कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते. हे खाते उघडण्यासाठी किमान 500 रुपये आवश्यक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *