महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १२ मे । हिंदू पंचांगानुसार, अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021) दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. धन लाभसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. विशेषकरुन अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी केली जाते (Buy These Things On Akshaya Tritiya 2021 Tithi To Please Goddess Lakshmi).
मान्यता आहे की, अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात. कोरोना काळात जर तुम्ही सोने-चांदी विकत घेऊ शकत नसल्यास या दिवशी काही खास वस्तू खरेदी करुन आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता. जाणून घ्या की या दिवशी सोन्याव्यतिरीक्त कोणती वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते –
नारळ खरेदी करा –
ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला नारळ खूप प्रिय आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळ खरेदी करणे घरासाठी फायदेशीर असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये नारळ वापरा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. घरात धन-धान्याची कमतरता भासणार नाही.
बासरी खरेदी करा –
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बासरी विकत घेणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी बासरीची पूदजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. पूजेमध्ये पिवळ्या घंटेचा देखील वापर करा.
शंख खरेदी करा –
भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख वापरणे खूप शुभ मानले जाते. शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोती शंख ठेवा. याशिवाय घरात आर्थिक समस्या दूर करण्यासाठी समृध्दी श्री यंत्र ठेवा.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…