महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १२ मे । सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरूच असून, सलग दुसर्या दिवशी मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल दरात 27 पैशांनी, तर डिझेल दरात 30 पैशांनी वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर मुंबई, कोल्हापूरसह बहुतांश शहरांतील पेट्रोलचे दर 98 रुपयांवर गेले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे लिटरचे दर 91.80 रुपयांवर गेले, तर मुंबईत हेच दर 98.12 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे पेट्रोल दराने 91.92 रुपयांची पातळी ओलांडली असून, चेन्नईमध्ये पेट्रोल 93.62 रुपयांवर गेले आहे. कोल्हापुरात मंगळवारी पेट्रोल प्रतिलिटर 98.08 (99) व डिझेल 88.14 (89) रुपये झाले आहे.
मागच्या आठवडाभरापासून देशभरात इंधन दरवाढ सुरु असून आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे परभणीत पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. आज आठव्या दिवशी 5 राज्याच्या निवडणूका झाल्या आणि देशभरात इंधन दरवाढ सुरु झाली. 8 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून आज पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैसे वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणी करांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पेट्रोलपाठोपाठ डिझेलचे दरदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दिल्लीत डिझेलचे लिटरचे दर 82.36 रुपयांवर गेले असून, मुंबईत हेच दर 89.48 रुपयांवर गेले आहेत. याशिवाय कोलकाता आणि चेन्नईत डिझेलचे दर क्रमशः 85.20 आणि 87.25 रुपयांवर गेले आहेत.