महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. १३ मे । कोरोनाच्या उपचारावर वापरण्यात येणारी लसी व औषधांवर GST लावणे आवश्यक आहे…नाहीतर दोन्हींची किंमतीत वाढ होईल….असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारामन यांनी केले!….
पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी कोरोनाशी संबंधित औषधांवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर अर्थमंत्र्यांनी रविवारी दिल्लीत झालेल्या पत्रकारपरिषदेत यावर स्पष्टीकरण दिले…….जीएसटीमुळे लस उत्पादकांना त्यांच्या खरेदीवर कराचा परतावा (इनपुट क्रेडिट टॅक्स) मिळतो. त्यामुळे कोरोनाची औषधे आणि लसीची किंमत कमी ठेवता येते. कोरोनाच्या लसी व औषधांवरील जिएसटी हटवला तर त्या त्याच्या किंमती कमी होण्या ऐवजी वाढतील असे अर्थमंत्र्यांचे म्हणने आहे……….वास्तविक पाहता तसे होणार नाही. कोणत्याही उत्पादित वस्तूंवर जि.एस.टी. ची सूट दिली तर त्या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याचा पश्र च येत नाही….अर्थमंत्र्यांना टॅक्स कॅल्क्युलेशन चे ज्ञान पूर्ण नसल्या मुळे त्यांनी ते स्पष्टीकरण दिले आहे…..किंमत वाढ होणारच नाही…किंमत कमीच होईल परंतू ती उत्पादक आता जे क्रेडिट घेतात तेवढ्याने कमी होणार नाही. तर उत्पादक च्या नफ्याच्या रक्कमेवर जो GST आकारला जातो तेवढयाने कमी होईल.