सलमानचा ‘राधे’ आज प्रदर्शित ; कधी, कुठे आणि कसा पाहता येणार चित्रपट?

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १३ मे । सलमान खानची प्रमुख भूमिका असेलला ‘राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ आज प्रदर्शित झाला आहे. हा ईद स्पेशल चित्रपट आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. कोरोना महामारीमुळे हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला . भारतात हा सिनेमा पे-पर-व्ह्यू म्हणजेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर या चित्रपटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्हा दुसऱ्यांदा हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्हाला पुन्हा पैसे मोजावे लागतील.

तर ‘राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ सिनेमा आखाती देशांसह इतर देशांमध्ये चित्रपटागृहांमधअये प्रदर्शित झाला . प्रभुदेवा हा या चित्रपटा दिग्दर्शक आहे. चित्रपटात सलमान खानसह दिशा पाटनी, रणदीप हुडा, बिग बॉस फेम गौतम गुलाटी आणि जॅकी श्रॉफ यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात सलमान खानने एका पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली असून तो ड्रग माफियाला संपवतो.

‘राधे’ हा पूर्णपणे कमर्शियल पॅकेज आहे. या सिनेमात अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि म्युझिकचा भरणा आहेत. सिनेमात सलमान खानचं नाव राधे आहे. 2009 मध्ये आलेल्या वॉण्टेड सिनेमातही त्याचं नाव राधे होते. परंतु हा चित्रपट वॉण्टेडपेक्षा पूर्णत: वेगळा आहे, असं सलमाननेच सांगितलं.

देशभरात ईद उद्या म्हणजेच 14 मे रोजी साजरी होणार आहे. परंतु चित्रपट आजच 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘राधेः युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. भारतात तो झी5, झीप्लेक्स आणि झी चॅनलवर पे पर व्ह्यू नुसार पाहता येईल. म्हणजेच इथे तुम्हाला जवळपास 249 रुपये मोजून चित्रपट पाहावा लागेल. याशिवाय हा चित्रपट इतर डीटीएच ऑपरेटर्स जसे की डी2एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवरही पे सर्व्हिसद्वारे उपलब्ध असेल. यामध्ये प्रेक्षकांना मल्टीपल ऑप्शनही देण्यात आले आहेत. प्रेक्षक त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहू शकतात.

…तर फ्री सबस्क्रिप्शन मिळणार
चित्रपट पाहण्यासाठी युझर्सना Zeeplex वर जाऊन निश्चित रक्कम भरावी लागेल. ओटीटी झी5 ने ठरवलं आहे की, “जे प्रेक्षक झी सिनेप्लेक्सवर ‘राधे: युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ पाहण्यासाठी पैसे भरतील त्यांना वर्षभर झी5वर उपलब्ध असलेला कंटेट पाहता येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *