महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।नवीदिल्ली । दि. १३ मे । Bank holidays in may 2021 in India: मे महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यापैकी काही सुट्ट्या आधीच संपल्या आहेत. येत्या 17 दिवसांत बँकेच्या शाखा वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण 6 दिवस बंद राहतील. या काळात बँकिंग सेवा ऑनलाईन माध्यमातून चालू राहतील.
RBI च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात एकूण 12 दिवसांसाठी बँक बंद राहतील. यापैकी काही सुट्ट्यांचा समावेश आहे. बऱ्याच सुट्ट्या आधीच निघून गेल्यात. मेच्या उर्वरित 17 दिवसांमध्ये बँका 6 दिवस बंद राहतील.
यापैकी काही बँक शाखा स्थानिक कारणांमुळे बंद राहतील. 13 मे रोजी ईद-उल-फितरच्या निमित्ताने बँका बंद राहतील. बेलामपूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुअनंतपूरममधील बँक शाखा या दिवशी बंद राहतील.
14 मे रोजी भगवान श्री परशुराम जयंती, रमजान ईद, बसवा जयंती, अक्षय तृतीया उत्सव आहे. बेलमपूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुअनंतपुरम मधील बँक शाखा या दिवशी बंद राहतील. याशिवाय रविवार, 16 आणि 23 मे रोजी आणि 22 मे रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी सर्वत्र बँकाच्या शाखा बंद ठेवल्या जातील.
बुद्ध पौर्णिमा 26 मे रोजी आहे. या दिवशी अगरताळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रामपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथे बँकेच्या शाखा बंद राहतील. याशिवाय 30 मे रोजी रविवारी सर्वत्र बँका बंद ठेवल्या जातील.